महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकला नाही -सुप्रिया सुळे

frame महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकला नाही -सुप्रिया सुळे

Thote Shubham

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या निकालाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील जनतेचे आणि मित्रपक्षांचे आभार मानले. दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र झुकला नाही आणि झुकणारही नाही, हा इतिहास महाराष्ट्रात पुन्हा घडला, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आपण जरी विरोधात असलो तरी महाराष्ट्रातील जनतेची सेवा पक्षाकडून नेहमीच केली जाईल, असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक यांनी सर्व जनतेचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी हे युती सरकार जाता जाता राहिलंय अशी प्रतिक्रिया मलिक यांनी दिली.

या निवडणुकीत सत्तेचा दुरुपयोग झाला, लाखो-करोडो रुपये जाहिरातबाजीवर खर्च करण्यात आले, विरोधकांवर खोटे आरोप करून त्यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचे काम झाल्याचे मलिक म्हणाले.                                                                                                                                                                                      


Find Out More:

Related Articles:

Unable to Load More